वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
माझ्या शेतात सिमेन्स गमेसा कंपनीकडून पवनचक्कीचे खांब रोवले आहेत. त्याची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. म्हणून मी त्यांचे काम अडवले आहे. या कंपनीच्या चार पाच कर्मचाऱ्यांनी २६ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास मला दमदाटी करून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मला न्याय द्यावा अशी विनंती तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील शेतकरी महेश अंकुश सुतार यांनी तहसीलदार संतोष रुईकर यांच्याकडे बुधवारी (दि.३०) निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात महेश सुतार यांनी म्हणले आहे की, माझ्या शेतातून सिमेन्स गमेसा पवनचक्कीचे खांब रोवले आहेत. त्याची नुकसान भरपाई मला अद्याप मिळालेली नाही. म्हणून मी त्यांचे काम अडवले आहे. याबाबत त्यांनी दि. २१ जून २०२० रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय यांना विनंती अर्ज दिला होता. या अर्जात सदरील कंपनीने कशा प्रकारे फसवणूक केली आहे हे नमूद केले आहे. मी माझ्या शेतात दि. २६ जून रोजी रात्री ९ च्या सुमारास गेलो होतो त्यावेळी पवनचक्की कंपनीचे चार पाच अधिकारी, कर्मचारी येऊन मला दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला न्याय द्यावा अशी विनंती शेतकरी महेश सुतार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
महेश सुतार या शेतकऱ्यावर कंपनीने अन्याय केला आहे. या शेतकऱ्यास न्याय मिळाला नाही तर पवनचक्की कंपनीविरुद्ध आंदोलन करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा उमरगा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे यांनी दिला आहे.