वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लग्नानंतर अपत्यप्राप्तीच्या सुखापासून वंचित राहिलेल्या दाम्पत्यास लोहारा शहरातील श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये वंध्यत्व निवारण उपचार घेतल्यानंतर यशस्वी अपत्यप्राप्ती झाली. त्याबद्दल त्या दाम्पत्याने डॉ. श्रीगिरे यांचा सत्कार केला.
अपत्यप्राप्ती झाल्यानंतर त्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. तसेच डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांचा सत्कार केला. या दाम्पत्यावर वंध्यत्व निवारण उपचार झाल्यानंतर पहिल्या दोन सिझेरियन शस्त्रक्रिया श्रीगिरे हॉस्पिटलमध्ये यशस्वीरित्या पार पडल्या. हे बाळ व बाळांतीण सुखरूप असून त्यांचा डिस्चार्ज झाला आहे. या दाम्पत्यास अनेक वर्षानंतर अपत्यप्राप्ती झाली आहे. या आनंदात त्या दाम्पत्याने डॉ. रुपाली श्रीगिरे व डॉ. हेमंत श्रीगिरे यांचा सत्कार केला.