वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तालुका कृषी अधिकारी कार्यालय लोहारा, निसर्ग संवर्धन संस्था लोहारा व हायस्कूल लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने लोहारा शहरातील कास्ती रोड वरील नाल्यावर शुक्रवारी (दि.१८) श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. यावेळी कृषी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना मृद संधारण, जल संधारण उपचारविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री मिलिंद बिडबाग, मंडळ कृषी अधिकारी श्री डी बी रितापुरे,श्री एस ए ताराळकर, निसर्ग संवर्धन संस्था चे श्री श्रीनिवास फुलसुंदर,श्री विरेश स्वामी,श्री गणेश रणशुर श्री अमित बोराळे हायस्कूल लोहारा चे मुख्याध्यापक श्री राठोड सर,श्री व्ही एस पाटील सर,श्री एस टी जट्टे ,तसेच कृषी विभागाचे श्री जे के गोसावी,श्री एम एस बिराजदार,श्री सागर पिचे श्री नागेश जट्टे ,श्री जी एस सागर श्री शैलेश जट्टे,श्री नीळकंठ पाटील श्री सचिन चेंडकाळे,श्री नितीन चेंडकाले,श्री अतुल बिराजदार, श्री मारुंबळे,श्री विशाल पवार, श्री सचिन पवार,श्री उमाकांत बिराजदार श्रीमती के एम जाधव तसेच नागरिक सागर रोडगे,विशाल बिराजदार यावेळी उपस्थित होते.
यावेळी हायस्कूल लोहाराच्या स्काऊट टीमचे सुमित नरगाळे, रितेश औरादे, शुभम तोडकरी, जय फरिदाबाद, सिध्देश्वर चौगुले, धीरज रसाळ, आयान शेख, फैसल मुलाणी, शुभम कांबळे या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले.
—–
यावर्षी मोठ्या प्रमाणत पाऊस झाल्यामुळे ओढ्याला पाण्याची धार सुरू आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेताजवळील नाल्यावरती सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या मध्ये नाल्यातील माती, वाळू भरून पिशवीचे तोंड बंद करून नाल्यामध्ये प्रवाहाच्या आडवे रचून घ्यावे. ज्यामुळे पाणी आडून पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. तसेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात पिकांना संरक्षित पाणी देता येईल.
मिलिंद बिडबाग
तालुका कृषी अधिकारी लोहारा