वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील मसणजोगी वस्तीत राहत असलेल्या गरीब, गरजूचे थंडीपासून रक्षण व्हावे यासाठी डॉ. हेमंत श्रीगिरे यांच्या वतीने वाढदिवसानिमित्त शनिवारी २७ ब्लँकेट व फळे वाटप करण्यात आले.
सध्या थंडीचे दिवस असून सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो. मात्र, जे गोरगरीब आहेत त्यांना पोटाची खळगी भरतानाच अडचण येते मग त्यांनी गरम कपडे कधी खरेदी करायचे? अशा वंचितांना आधार देण्यासाठी, त्यांची थंडी काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. सामाजिक बांधिलकी जपत सर्वांनी होईल तेवडी मदतीचा हात पुढे करून समाजात निर्माण झालेली दरी काही अंशी कमी होण्यास मदत होऊ शकेल असे मत डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी यावेळी व्यक्त केले.लोहारा येथील डॉ. हेमंत श्रीगिरे यांनी वाढदिवसानिमित्त शहरातील मसणजोगी वस्तीत राहत असलेल्या गरीब कुटुंबांना ब्लँकेट व फळे वाटप केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते नागण्णा वकील, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग प्रदेश सरचिटणीस तथा नगरसेवक जालिंदर कोकणे, काँग्रेस युवक शहराध्यक्ष हरी लोखंडे, भाजपा जिल्हा कार्यकरणी सदस्य कमलाकर सिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य बाबा शेख, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, मा.पंस सदस्य सुधीर घोडके, स्टेट बँक इंडिया लोहारा शाखा प्रबंधक प्रसाद कांबळे, विश्वजीत नरवडे, राजु स्वामी, उत्तम पाटील, बसय्या स्वामी सर, किशोर जावळे, खंडू सरवदे, अनिल येलुरे, स्वप्नील पटवारी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्तविक दयानंद गिरी यांनी तर बसय्या स्वामी सर यांनी आभार मानले.