वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील जिल्हा परिषद शाळेच्या शालेय शिक्षण समिती अध्यक्ष पदी बालाजी किर्तने यांची तर उपाध्यक्ष पदी सिद्राम तांबडे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील जेवळी (उत्तर) येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय शिक्षण समितीची निवड करण्यासाठी बुधवारी (दि. २५) पालकांची बैठक घेण्यात आली.यावेळी समितीमध्ये प्रत्येक वर्गाचे एक प्रतिनिधी असे आठ पालकांची निवड करण्यात आली. यात अनिल दंडगुले, गुंडेशा होनाजे, रिजवाना शेख, स्वाती बिराजदार, वैशाली कलशेट्टी, सिद्राम बिराजदार, आम्रपाली शंकर, बालाजी किर्तने यांची निवड करण्यात आली. त्यामधून सर्वानुमते बालाजी कीर्तने यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी सिद्राम तांबडे यांची निवड करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी. आर. साळुंके, शिक्षक के. एम. येणेगुरे, एम .टी. राठोड, आर .जी. निंगशेट्टी, के .जी. पुजारी, एस. एम. गिराम, एस. डी. पाटील व ग्रामपंचायत सदस्य प्रविण बोंदाडे, सामाजिक कार्यकर्ते संगाप्पा मुखे, भीमाशंकर साखरे, राजू उपासे, सचिन चौगुले, नागनाथ होनाजे, दत्ता होनाजे, शिवशरण साखरे, प्रकाश कीर्तने यांच्यासह पालक उपस्थित होते. या निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला.