वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सुचनेनुसार जीर्ण शिधापत्रीका बदलुन देणे, विभक्त शिधापत्रीका देणे, तसेच शिधापत्रीकेतील नाव कमी करणे व नाव समाविष्ट करणे बाबत तालुकास्तरावर मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार लोहारा, माकणी व जेवळी या मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार संतोष रुईकर यांनी दिली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून लोहारा मंडळातील सर्व गावांसाठी दि. २५ ऑगस्ट रोजी लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दि. २६ व २७ ऑगस्ट रोजी अनुक्रमे माकणी व जेवळी ग्रामपंचायत कार्यालयात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात शिधापत्रिकेमध्ये नाव समाविष्ट करणे, नाव कमी करणे, नावांमध्ये दुरुस्ती करणे, दुय्यम शिधापत्रिका देणे, महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य प्रमाणपत्र देणे आदी कामे होणार आहेत. याचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक त्या कागदपत्रांसह मंडळनिहाय नेमून दिलेल्या ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार संतोष रुईकर यांनी केले आहे.