Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

शेतकऱ्यांचे ऊस बिलासाठी सुरू असलेले सामुदायिक आत्मदहन आंदोलन तात्पुरते स्थगित – आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष

admin by admin
11/01/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखाना प्रशासनाकडे ऊस बिलाचे उर्वरित ५०० रुपये देण्यात यावे अशी अनेकवेळा मागणी केली होती. तरीही कारखाना प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याच्या उद्देशाने हातात पेट्रोल बाटल्या घेऊन सुमारे सहा तास आंदोलन केले. कारखाना प्रशासनाने बैठक घेण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले.
तालुक्यातील होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मागील वर्षी लोकमंगल कारखान्यास ऊस दिला आहे. लोकमंगल कारखान्याने दोन हजार प्रमाणे ऊस दर दिला होता. इतर कारखान्याने पंचेविसशे रुपये दर दिला आहे. त्यामुळे उर्वरीत थकीत ५०० रुपये रुपयांचा हप्ता द्यावा या मागणीसाठी होळी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अनेकवेळा कारखाना प्रशासनास निवेदन देऊन उर्वरीत बिलाची मागणी केली. तसेच यापूर्वी कारखाना स्थळी आंदोलन केले होते. दरम्यान, पाच जानेवारीपर्यंत थकीत बिल देण्यात यावे अन्यथा मंगळवारी १० जानेवारीला सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन होळी येथील सार्वजनिक पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करून निर्णय लवकर घ्या, अन्यथा सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला. कारखाना प्रशासनाचे अधिकारी उशिरा आले. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्यासह पोलीस कर्मचारी आंदोलन स्थळी हजर झाले होते.

आंदोलन

यावेळी कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि.११) पोलिस ठाण्यात बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर तब्बल सहा तासानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले. या आंदोलनात केशव सरवदे, व्यंकट माळी, संजय मनाळे, पांडुरंग जाधव, दत्तू भोसले, अमोल गायकवाड, प्रवीण मोरे, संजय जाधव, प्रियेश जाधव, भुजंग मोरे, शिवाजी पवार, अनिल गायकवाड, माधव पाटील, मारुती जाधव, किसन पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर गवळी, दत्तू गिरी, मधुकर बिराजदार, व्यंकट जाधव आदी सहभागी झाले होते. आंदोलन तात्पुरते स्थगित झाले असले तरी बुधवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोकमंगल साखर कारखाना
Previous Post

सूरज पुकाळे याची महाराष्ट्र सुरक्षा बलामध्ये निवड झाल्याबद्दल महाविद्यालयात सत्कार

Next Post

ब्रेकिंग न्युज ! माजी मंत्री आ. बच्चू कडू यांचा अपघात – पायाला व डोक्याला गंभीर दुखापत

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

ब्रेकिंग न्युज ! माजी मंत्री आ. बच्चू कडू यांचा अपघात - पायाला व डोक्याला गंभीर दुखापत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's