लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा इयत्ता दहावी निकाल १०० टक्के लागला आहे. याबद्दल विद्यालयाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक प्रमाणपत्र बोर्ड परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २ जून) रोजी जाहीर झाला. यात लोहारा तालुक्याचा निकाल ९३.७८ टक्के लागला आहे. तालुक्यातील सालेगाव येथील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. या विद्यालयातील शुभम घोगे याने ९३ टक्के गुण मिळवत प्रथम, आदर्श भालेराव याने ९२.६० टक्के गुण मिळवत द्वितीय तर सारिका साळुंके हिने ९१.६० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला. विद्यालयातील श्रेया स्वामी हिने ९१ टक्के, रविना घोगे ९०.६० टक्के, क्रांती मातोळे ९०.२० टक्के गुण मिळवले आहेत.
विद्यालयातील एकूण ४५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २७ विद्यार्थी विशेष प्रविण्यासह, १५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. संस्थेच्या अध्यक्षा शैलजाताई मगर, सचिव सुरेश (दाजी) बिराजदार, सहसचिव अशोकराव मोरे, उपाध्यक्ष गोविंदराव साळुंके, कोषाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार, सर्व संचालक, मुख्याध्यापक एस. जी. रोहिणे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.