वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शिवसेना भवन मुंबई येथे लोहारा उमरगा तालुक्यातील पदाधिकारी यांनी बुधवारी (दि.१८) शिवसेना सचिव अनिल देसाई यांची भेट घेतली. लोहारा उमरगा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षसंघटना व पक्षबांधणी संदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे उपस्थित पदाधिकारी यांनी सांगितले.
लोहारा उमरगा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य नोंदणी अभियान प्रभावीपणे राबवावे असे यावेळी त्यांनी सांगितले. हे अभियान राबवत असताना पुढे येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समीती व जिल्हा परिषद निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सर्व शिवसेना पदाधिकारी यांनी जोमाने सदस्य नोंदणी अभियान रावबावे असेही शिवसेना सचिव अनिल देसाई यांनी सांगितले. यावेळी शिवसेना नेते विश्वनाथ नेरुळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ. कैलास पाटिल, शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम लटके, विधानसभा संपर्कप्रमुख अनंत पाताडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख बसवराज वरनाळे, शिवसेना उमरगा तालुका प्रमुख बाबुराव शहापुरे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, शिवसेना लोहारा शहरप्रमुख सलिम शेख, शिवसेना उमरगा शहरप्रमुख राजेंद्र सुर्यवंशी, शिवसेना तुळजापुर शहरप्रमुख सुधीर कदम यासह धाराशिव जिल्हातील प्रमुख पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते.