Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
चेन्नई येथील प्राईम पॉईंट फाऊंडेशन आणि इ- मॅगझिनतर्फे देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शनिवारी (दि. 20) प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा, केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती ए. के. पटनायक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
संसद महारत्न पुरस्काराबरोबरच खा. सुप्रिया सुळे यांना विद्यमान सतराव्या लोकसभेतील त्यांची उपस्थिती आणि चर्चेतील सहभागासाठी सलग सहाव्यांदा जाहीर झालेला संसदरत्न पुरस्कारही याच कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.

\"\"

लोकसभेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना फाऊंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या संकल्पनेतून हा पुरस्कार सुरु करण्यात आल्याचे फाऊंडेशनचे के. श्रीनिवासन यांनी सांगितले आहे. गत सोळाव्या लोकसभेत खा. सुप्रिया सुळे यांनी सभागृहात 96 टक्के उपस्थिती लावत 152 चर्चासत्रांत सहभाग घेतला. त्यांनी एकूण 1186 प्रश्न उपस्थित केले, तर 22 खासगी विधेयके मांडली. यासाठी त्यांना फाऊंडेशनतर्फे दर पाच वर्षांनी देण्यात येणारा संसद महारत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. याबरोबरच चालू सतराव्या लोकसभेतही खा. सुप्रिया सुळे यांच्या कामगिरीतील सातत्य कायम असून त्यांनी 89 टक्के उपस्थिती लावत 122 चर्चासत्रात भाग घेतला आहे. सभागृहात एकूण 286 प्रश्न त्यांनी विचारले असून चार खासगी विधेयके मांडली आहेत. या कामगिरीसाठी त्यांना पुन्हा एकदा म्हणजे सहाव्यांदा संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हावासीयांच्या वतीने अभिनंदन केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: खा. सुप्रिया सुळेजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार
Previous Post

\’थँक यू मोदी सरकार\’ म्हणत बॅनरच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने साधला भाजपवर निशाणा

Next Post

उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!