वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील स्वामी रामानंद तीर्थ येथे शाळेच्या पहिल्या दिवशी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांनी शाळेला भेट देऊन शाळेच्या परिसराची पाहणी केली. इ.८ वी प्रवेशीत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करुन त्यांच्या हस्ते मुलांना गोड पदार्था सोबत शालेय पोषण आहार वाटप करण्यात आला. शाळेच्या परिसरातील राष्ट्रीय शाळेच्या ऐतिहासिक वारसा संदर्भात त्यांनी माहिती जाणून घेऊन राष्ट्रीय शाळेच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी संजय ढाकणे, लोहारा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, विषयतज्ञ अनंत लहाने यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.बी. भोयटे यांनी शाळेचे वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत केले. भास्कर बेशकराव यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरबद्दल व व्यक्तिमत्व विकासाबद्दल अगदी हसत खेळत मार्गदर्शन केले. यावेळी एम. के. जाधव, बी. एस. स्वामी, जी. डी. मैंदाड, बी. जे. मनोहर, ए. व्ही. जाधव, एस. के. जाधव यांच्यासह कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.