वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पाण्याच्या टाकीजवळील गटार पूर्ण भरलेली आहे. त्यामुळे गटारीतील पाणी मुख्य रस्त्यावर येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने तात्काळ याठिकाणी स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात पाण्याची टाकी आहे. या टाकीतून अनेकजण पाणी घेऊन जातात. या पाण्याच्या टाकीजवळ असलेली गटार पूर्ण भरल्याने या गटारीतील दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून याठिकाणची नगरपंचायतने लक्ष देऊन तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.