वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जागतिक महिला दिना निमित्ताने ग्रामपंचायत दारफळ बीबी आयोजित महा आवास अभियान कालावधीमध्ये पंतप्रधान व रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण झालेल्या लाभार्थींचा गृहप्रवेश कार्यक्रम व जागतिक महिला दिनानिमित्त उपस्थित महिलांचा विशेष सन्मान कार्यक्रमाचे सोमवारी (दि.८) आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी पंचायत समिती उत्तर सोलापूरच्या गटविकास अधिकारी डॉ. जस्मीन शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. याकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच अर्चना विठ्ठल ननवरे या होत्या. या कार्यक्रमास तालुकास्तरावरील घरकुल विभागाचे अन्सारी साहेब, डाटा ऑपरेटर बिदरगुंडी, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता रिता सुरवसे, उपसरपंच नारायण सर्वगोड, माजी सरपंच शिवाजी ननवरे, ग्रामसेवक संजय पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री आवास योजना सन 2020 – 21अंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले लाभार्थी आबासाहेब भीमराव ननवरे यांचा सपत्नीक सत्कार करून गृहप्रवेश कार्यक्रम त्यांना त्यांचा घराची चावी देऊन करण्यात आला. रमाई आवास योजना 2019-20 अंतर्गत घरकुल बांधकाम पूर्ण केलेले शंकर गंगाराम जरीपटके यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांना घराची चावी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली.