Vartadoot
Thursday, May 15, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा – धोका कमी झाला असला तरी जिल्ह्यांनी मदत कार्य वेगाने सुरु ठेवावे – परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या सूचना – पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांशी देखील सातत्याने संपर्क

admin by admin
17/05/2021
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मुंबई दि १७: तोत्के चक्रीवादळामुळे मुंबई तसेच सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांत काही प्रमाणात नुकसान होऊन निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तसेच चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असला तरी कोकणातील मुसळधार पाउस व जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याच्या आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या वादळामुळे एकूण ६ मृत्यू झाले असून ९ जण जखमी झाले आहेत. एकूण १२ हजार ५०० जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. किनाऱ्यावरील जिल्ह्यांमध्ये काही नुकसान व पडझड झाली असली तरी कोविड रुग्णालयांना वीज पुरवठा खंडित होऊ देण्यात आलेला नाही त्याचप्रमाणे पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था सक्षमपणे सुरु आहे याविषयीही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली.

रस्त्यावरील पडलेली झाडे, पडलेले विजेचे खांब तातडीने काढून तसेच अगदी गावांपर्यंत जाणारे अंतर्गत रस्तेही मोकळे करून वाहतूक सुरु राहील याची काळजी घेण्यास मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनास सांगितले. मच्छिमारांच्या काही बोटींचे नुकसान झाल्याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

कालपासूनच या चक्रीवादळाचा परिणाम सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांना जाणवू लागला होता. संध्याकाळनंतर तोक्ते चक्रीवादळ किनाऱ्यालागत येऊ लागले तसतसे विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड भागात जोरदार पाउस, वादळी वारे वाहू लागले तसेच मुंबईत देखील त्याचा परिणाम जाणवू लागला होता. पहाटेपासून तर मुंबईत दक्षिण मुंबई तसेच पश्चिम उपनगरातही जोरदार वारे तसेच मुसळधार पाउस सुरु झाला. मुंबई महानगरपालिकेने आपत्ती नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर लक्ष ठेवले होते तसेच संबंधित यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली

२ हजार ५४२ बांधकामांची पडझड

या चक्रीवादळामुळे २ हजार ५४२ घरांची अंशत: तर ६ घरांची पूर्ण पडझड झाली आहे. यात ठाणे जिल्ह्यात २४, पालघर ४, रायगड १७८४, रत्नागिरी ६१, सिंधुदुर्ग ५३६, पुणे १०१, कोल्हापूर २७, सातारा ६ अशा पडझड झालेल्या बांधकामांचा तपशील आहे. रायगड आणि रत्नागिरी येथे प्रत्येकी २ अशी ४ जनावरे मरण पावली आहेत.

मुख्यमंत्र्यांनी सबंधित जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून त्यांनाही परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले असून कोकण विभागीय आयुक्त तसेच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून मुख्यमंत्री सातत्याने माहिती घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाचे ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ कृष्णानंद होसाळीकर यांच्याशीही चर्चा केली. आज (सायंकाळी 5 वाजेच्या स्थितीनुसार ) हे चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यापासून समुद्रात १८० किमी दूर असून दिवसभर असणारा वाऱ्याचा वेगही हळूहळू कमी होऊन ७० ते ८० किमी प्रती तास इतका होईल पुढे तो आणखी ओसरेल असे त्यांनी सांगितले. हे चक्रीवादळ आज रात्री ८ ते ११ पर्यंत गुजरातेत धडकेल. त्यावेळी तेथील वाऱ्याचा वेग हा पावणे दोनशी किमी प्रती तास इतका असू शकतो. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागेल असेही त्यांनी सांगितले. गेल्या ६ तासांत मुंबई उपनगरात १२० मिमी पेक्षा जास्त तर कुलाबा भागात १०० ते १२० मिमी पाउस झाल्याची माहिती त्यांनी दिली.

मुंबईत ३ कोविड केंद्रातील रुग्णांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे तसेच मुंबईत पडलेली झाडे व खांब काढण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे अशी माहिती बृहन्मुंबई पालिकेने दिली. चक्रीवादळामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, याचा परिणाम हवाई वाहतुकीवरही झाला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन होणारी हवाई वाहतूक थांबवण्यात आली, तसेच रेल्वे वाहतुकीवर झालेल्या परिणामाची माहिती मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांकडून घेतली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आढावाचक्रीवादळमुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Previous Post

१८ मे रोजी ४५ वर्षांच्या वरील नागरिकांना मिळणार कोविशील्ड लसीचा पहिला डोस

Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध – पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करत दिले निवेदन – दरवाढ कमी करण्याची पंतप्रधान यांच्याकडे केली मागणी

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
Next Post

लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध - पेट्रोल डिझेल व खतांच्या दरवाढीच्या विरोधात निषेध व्यक्त करत दिले निवेदन - दरवाढ कमी करण्याची पंतप्रधान यांच्याकडे केली मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

497618

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!