वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचत गटांच्या महिलांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. दि.13 ते 15 जुलै या दरम्यान तालुक्यातील दादगी येथे गटांच्या महिलांसाठी आर्थिक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांना बँकेच्या विविध आर्थिक व्यवहाराची माहिती व्हावी, बँकेकडून देण्यात येणाऱ्या विविध सुरक्षा विमा योजना, वैयक्तिक बँक खाते महत्त्व तसेच सावकारी कर्जाचे तोटे व बँक कर्जाचे महत्त्व याबाबतची सविस्तर माहिती महिलांना देण्यात आली.प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी महिलांनी आपल्या बचतीचा चांगला विनियोग करून, उमेद अभियानाकडून मिळणाऱ्या बँक कर्ज बाबत तसेच गावास्तरावर निर्माण करण्यात येणाऱ्या विविध उपजीविका व्यवसायाबद्दल सविस्तर मार्गदर्शन करून सर्व महिलांनी वैयक्तिक बँक खाते काढून बँकेच्या सर्व सुरक्षा विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रशिक्षणादरम्यान एकूण 35 महिलांनी प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती बीम योजनेचे आवेदन पत्र भरण्यात आले. या प्रशिक्षणाचे यशस्वी नियोजन आर्थिक साक्षरता सखी सरस्वती सरवडे, जयश्री चोपणे, कांचन भोसले यांनी केले. प्रशिक्षणासाठी तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर हे उपस्थित होते. या प्रशिक्षणास एकूण 90 महिला उपस्थित होत्या.