वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने राज्यात दि. 15 जून ते 15 जुलै 2021 या कालावधीत सुरू करण्यात आलेल्या माझी परस बाग मोहीमे अंतर्गत शुक्रवारी (दि.18) निलंगा तालुक्यातील हाडोळी येथे आरोग्यदायी पोषण बागेची निर्मिती करण्यात आली. यावेळी तालुक्यातील सीटीसी यांनी उपस्थित सर्व कृषी सखी, पशु सखी, सीआरपी व गटातील महिला यांना 14 वाफ्याची गोलाकार उमेदची पोषण बाग तयार कऱण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी उपस्थित महिलांना कमी जागेत या परस बागेत विविध प्रकारच्या भाज्या पिकवून आपल्या आहारात त्याचे सेवन करून पोषण मूल्यांची वाढ होऊन सुदृढ जीवन जगता येईल असे सांगून आरोग्यदायी पोषण बागेचे महत्त्व व उपयुक्तता सविस्तर विशद करून सांगीतले.तसेच गटातील सर्व महिलांनी अश्या प्रकारची पोषण बाग करून भाजीपाला यावर होणार खर्च कमी करू विषमुक्त भाजीपाला खाऊन सुदृढ आरोग्य जोपासवे असे आवाहन केले. पोषण बाग निर्मितीचे यशस्वी नियोजन तालुका व्यवस्थापक अरुण शाहीर व प्रभाग समन्वयक संतोष पालखे यांनी केले. यावेळी मदनसुरी व सरवडी प्रभागातील सीआरपी, कृषी सखी, पशु सखी व गटातील महिला उपस्थित होत्या.