बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेच्या माध्यमातुन लोहारा शहरातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्यातर्फे प्रभाग क्रमांक सहा मधील खुटेपड यांच्या विवाहात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर करण्यात आला आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्रमांक ६ च्या नगरसेविका मयुरी बिराजदार व युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजना सुरू करण्यात आली आहे. प्रभागातील सामान्य कुटूंबातील मुलीच्या कन्यादानासाठी सामाजिक बांधिलकी जपत आपलाही काही हातभार राहावा या उदात्त हेतुने ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रभागातील रघुवीर घोडके यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात खा. ओम प्रकाश राजेनिंबाळकर यांच्या हस्ते ५ ग्रॅम सोन्याची अंगठी देऊन या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यानंतर सोमनाथ निर्मळे यांच्या मुलीच्या विवाहात पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर करण्यात आला. याच प्रभागातील रहेमान खुटेपड यांची मुलगी शमिन यांचा रविवारी (दि.३०) विवाह होता. याप्रसंगी पाच ग्रॅम सोन्याची अंगठी व भरपेहराव आहेर करण्यात आला आहे.
या योजनेचा लाभ प्रभाग क्रमाक ६ मधील सर्वसामान्य कुटूंबियांना होणार आहे. या पूर्वीही प्रभाग ६ मधील नागरीकांसाठी ते राहत असलेल्या घराच्या घरपट्टीत कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजनेच्या माध्यमातुन १० टक्के सुट देण्यात येत आहे. यावेळी माजी सरपंच शंकर जट्टे, तालुका देखरेख संघाचे माजी चेेअरमन दत्तात्रय बिराजदार, माजी ग्रा.पं. सदस्य महेबुब गवंडी, पत्रकार आब्बास शेख, सोसायटीचे माजी संचालक रघुविर घोडके, प्रकाश भगत, मुन्ना जाधव, दयानंद स्वामी, अविनाश रसाळ, शिवकुमार बिराजदार, ओमकार बिराजदार, रहेमान खुटेपड, मुस्तफा खुटेपड, मज्जीद खुटेपड, महेमुद खुट्टेपड यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.