Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीत मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवर चर्चा – मराठा आरक्षण निवडसूचीतील १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by admin
in महाराष्ट्र
A A
0

मुंबई :
राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत घेण्यात आलेल्या विविध पदांवरील परीक्षेत मराठा आरक्षण घेऊन निवडसूचीत असलेल्या १ हजार ६४ उमेदवारांना तात्काळ नियुक्ती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई, माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, मराठा मोर्चाचे आबासाहेब पाटील, विनोद पाटील यांचेसह मराठा आरक्षणासाठी काम करणाऱ्या विविध संघटना आणि पदाधिकारी उपस्थित होते.

\"\"

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, साधारणपणे २ हजार १८५ उमेदवार मराठा आरक्षण घेऊन शासन सेवेत रुजू होणार आहेत. यापैकी ४१९ उमेदवार शासन सेवेत रुजू झाले आहेत तर १ हजार ६४ उमेदवारांना विविध विभागांमध्ये तत्काळ रुजू करण्याची कार्यवाही सुरू करण्यात येईल. या नियुक्त्या करण्याबाबतचा अध्यादेश तातडीने काढण्यात येईल. उर्वरित ७०२ उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकारी, तसेच विभाग यांच्यामार्फत विशेष मोहीम घेण्यात येईल.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना अधिक सक्षम करण्यात येणार

येत्या काळात स्थापन करण्यात येणारी उपसमिती मराठा आरक्षण संदर्भातील सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ आणि सारथी या संस्थांना सक्षम करण्यास प्राधान्य देण्यात येईल , असेही श्री. शिंदे यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य शासनाची बाजू अधिक सक्षमपणे मांडण्यासाठी अभ्यास करण्यात येईल.

\"\"

सारथी संस्थेला निधी कमी पडू दिला जाणार नाही – उपमुख्यमंत्री

मराठा आरक्षण संदर्भातील मंत्रिमंडळ उपसमिती सर्व समस्या जाणून घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करेल. मराठा समाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेला राज्य शासनामार्फत निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

महसूल मंत्री श्री. विखे- पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतची स्थिती सक्षमपणे मांडण्यासाठी हे शासन प्रयत्न करेल.

या बैठकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. पाटील म्हणाले की, मराठा आरक्षण देण्याबाबत पुढील कार्यवाही करताना यापुढे माझ्यासह मंत्री आणि सचिव सोमवार ते बुधवार दुपारी ४ ते ६ या वेळेत मंत्रालयात समस्या सोडविण्यासाठी उपस्थित राहतील.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आपले जीवन वाहून घेणारे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार विनायक मेटे यांना बैठकीच्या प्रारंभी श्रद्धांजली वाहण्यात आली. याच बैठकीत सारथी संस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसछत्रपती संभाजीराजेमराठा आरक्षणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Previous Post

आगामी निवडणुका शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र लढणार – उद्धव ठाकरे – लोकशाही आणि प्रादेशिक अस्मिता जपण्यासाठी युती

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते झाला उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते झाला उत्कृष्ट बैलजोडीचा सन्मान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!