वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पक्ष संघटनेत सभासद नोंदणी हा संघटना वाढीचा पाया आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त सभासद नोंदणी करावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी बुधवारी (दि. २१) उस्मानाबाद जिल्ह्याच्या कार्यकारिणीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्ष संघटनेत सभासद नोंदणी हा संघटना वाढीचा पाया आहे. या जिल्ह्यातून प्राथमिक व क्रियाशील सदस्य नोंदणी अधिक होईल, अशा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला. संघटनेत विविध पदांवर काम करणारे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी करणे आवश्यक आहे. पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवायचा असेल तर विद्यार्थी व युवक काँग्रेसने विशेष परिश्रम घेतले पाहिजे असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
यावेळी माजी खा. जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार राहुल मोटे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, शहराध्यक्ष संजय निंबाळकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष मोहमद खान पठाण, निरीक्षक रमेश बारसकर, प्रताप पाटील, महिला मराठवाडा अध्यक्षा वैशाली मोटे, जिल्हाध्यक्षा मनिषा पाटील, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, सुरेश पाटील आदीसह सर्व तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.