वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोककल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने उमरगा तालुक्यातील कोराळ येथील प्रतिवर्षाप्रमाणे आयोजित गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धेतील विजेत्या महिलांना सोमवारी (दि.५) बक्षीस वितरण करण्यात आले.
महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी उमरगा तालुक्यातील कोराळ येथील लोककल्याण संस्थेचे अध्यक्ष विक्रम दासमे यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत गावातील ३२ महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता. स्पर्धेतील पहिले बक्षीस कौशल्या पांचाळ, दुसरे बक्षीस राधा निवृत्ती कदम, तिसरे बक्षीस अश्विनी गंगाराम पवार,अनुसया अण्णाराव माने, शोभा राजेंद्र सुरवसे, चौथे बक्षीस ज्योती भगवान पवार या महिलांनी मिळविले. विजेत्या महिलांना आकर्षक भेटवस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव रवि दासमे, निवृत्ती कदम, धनराज जाधव, महिला अध्यक्षा छाया दासमे, शितल दासमे, पद्मावती दासमे, संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, तुकाराम दळवे, जयेश दासमे, पार्थ दासमे, विजय पांचाळ, पारश जाधव, संभाजी जंगाले, विशाल सुरवसे आदीसह लोककल्याण संस्थेचे सदस्य व विजेत्या महिला उपस्थित होत्या.