वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथे रविवारी (दि. ५) जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त मंडळ कृषी अधिकारी रवी बनजगोळे यांनी माती परीक्षणनुसार खताची मात्रा कशी द्यावी याविषयी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.
तालुक्यातील आष्टाकासार येथे जागतिक मृद दिन साजरा करण्यात आला. यावेळी आरोग्य पत्रिकेचे वाचन करण्यात आले. तसेच रब्बी हंगाम हरभरा, ज्वारी पिकाचे रोग व किड व्यवस्थापन व उन्हाळी सोयाबीन पेरणी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आष्टाकासार चे कृषी सहाय्यक सचिन पवार यांनी शेतकऱ्यांना महाडीबीटी अंतर्गत विविध योजना, एमआरइजीएस अंतर्गत फळबाग, गांडूळ, नॅडेप आदी योजनांमध्ये शेतकऱ्यांना प्रस्ताव सादर करावे असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रगतशील शेतकरी सिद्राम तडकले, अण्णाराव पाटील, नितीन अष्टेकर, अमोल सोमवंशी, रवींद्र शिदोरे, गहिनीनाथ कागे, पप्पू व्हर्टे, खंडू शेरीकर, बालाजी कोरे, मुकेश मुळे, चतुर्भुज कागे, शिवु सोलापुरे, तानाजी कागे, शिवमुर्ती फुंड्डीपल्ले, नागनाथ मदने, रतन अल्लिशे, अशोक पोळे, प्रकाश पांढरे, कृषी मित्र पिंटू मदने यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.