लोहारा तालुक्यातील मुर्शदपुर, बेंडकाळ व उंडरगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक तरुणांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शुक्रवारी (दि. २) उमरगा येथे शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. आमदार ज्ञानराज चौगुले, युवा नेते किरण गायकवाड व जिल्हाप्रमुख मोहन पणूरे यांनी या सर्व युवकांचे स्वागत केले.
उमरगा येथे या तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तालुक्यातील मुर्शदपुर येथील युवराज पाटील, अनिल बलसुरे, बिभीषण मोरे, रणधीर माने, भागवत आनंदगावकर, शेखर पाटील, नामदेव मोरे, अक्षय माने, पिंटू गोबाडे, सुमित बलसुरे, सागर मोरे, अविनाश पाटील, शिवाजी माने, उंडरगाव येथील अक्षय रवळे, बेंडकाळ येथील प्रतीक गोरे आदींनी यावेळी प्रवेश केला आहे. याप्रसंगी लोहारा तालुकाप्रमुख जगन पाटील, बळीराम सुरवसे, उपतालुकाप्रमुख परवेज तांबोळी, सुरेश दंडगुले, सागर पाटील, सहदेव गोरे आदी उपस्थित होते.