Friday, October 23, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापती निवडी बिनविरोध ; कोणाला मिळाली संधी, वाचा सविस्तर

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा नगरपंचायतच्या विषय समितीच्या सभापती, स्थायी व विषय समितीच्या सदस्यांच्या निवडीसाठी बुधवारी (दि.२१) नगरपंचायत सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. निवडीनंतर नगरपंचायतीच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.
लोहारा नगर पंचायत सदस्यांचे स्थायी समिती, विषय समितीवर सदस्यांचे नामनिर्देशन तसेच विषय समितीचे सभापती निवडीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ६३ (२), ६५ (४) अन्वये स्थायी समिती, विषय समित्यावर सदस्यांचे नामनिर्देशन करण्यासाठी व त्यांचे सभापती निवडण्यासाठी जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने लोहारा बु. नगर पंचायतच्या सभागृहात बुधवारी (दि.२१) सर्व सदस्यांची विशेष सभा घेण्यात आली. पिठासीन अधिकारी तथा तहसिलदार काशीनाथ पाटील व लोहारा बु. नगरपंचायतचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांच्या उपस्थितीत हा निवडीचा कार्यक्रम पार पाडले. या निवडी बिनविरोध पार पडल्या.
यात महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती पदी संगीता किशोर पाटील यांची निवड झाली आहे. या समितीत सदस्य म्हणून सारिका बंगले, कमल भरारे, अमीन सुंबेकर, जालिंदर कोकणे यांचा समावेश आहे. सार्वजनिक कर संकलन, विकास, नियोजन व शिक्षण समितीच्या सभापती पदी उपनगराध्यक्ष आयुब शेख यांची निवड झाली आहे. या समितीत गौस मोमीन, सुमन रोडगे, शामल माळी, प्रशांत काळे यांचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता व दिवाबत्ती समितीच्या सभापती पदी शामल माळी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत आरती कोरे, कमल भरारे, जालिंदर कोकणे, आरिफ खानापुरे यांचा समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम व अर्थ समितीच्या सभापती पदी सुमन रोडगे यांची निवड झाली आहे. यात अमीन सुंबेकर, सारिका बंगले, जालिंदर कोकणे, विजयकुमार ढगे यांचा समावेश आहे. सार्वजनिक पाणीपुरवठा व जलनि:सारण समितीच्या सभापती पदी शमाबी शेख यांची निवड झाली आहे. यात सदस्य म्हणून गौस मोमीन, आरती कोरे, आरिफ खानापुरे, जालिंदर कोकणे यांचा समावेश आहे.

\"\"

या निवडी झाल्यानंतर नगरपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार किशोर पाटील, मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, आकांक्षा चौगुले, नगराध्यक्षा वैशाली खराडे, कार्यालयीन अधीक्षक जगदीश सोंडगे, जगन्नाथ पाटील, अभिमान खराडे, अविनाश माळी, दिपक रोडगे, प्रमोद बंगले, आयुब शेख, सुरेश दंडगुले, आदींसह नगरपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: लोहारा नगरपंचायत
Previous Post

महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या मागणीनंतर महामार्ग प्राधिकरण व गुत्तेदाराला आली जाग – गंजलेल्या सळ्यांचे सांगाडे तात्काळ काढून टाकले

Next Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन ; हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन ; हिंदुजा रुग्णालयात उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!