Thursday, October 8, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील ५ गावांमध्ये जल शक्ती अभियान संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील तावशीगड, सास्तूर, मुर्शदपुर, उदतपूर व सालेगाव आदी गावांमध्ये नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद व श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्था एकुरगावाडी तसेच उमेद अभियान लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने जलशक्ती अभियान राबविण्यात आले.\"\"श्री छत्रपती शिवाजी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष कृषी व्यवस्थापक किशोर औरादे, संजय गुजरे, तंटामुक्ती अध्यक्ष राम मिटकरी, प्रभाग समन्वयक प्रीतम बनसोडे, कृषी व्यवस्थापक सचिन गायकवाड, पशु व्यवस्थापक प्रदीप लोंढे आदीनी गावोगावी जाऊन मार्गदर्शन केले. किशोर औरादे जलशक्ती अभियान अंतर्गत (कॅच द रेन) पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर माहिती सांगताना म्हणाले की, पाणी अडवून जमिनीमध्ये मुरल्यामुळे पाण्याची पातळी वाढते, मातीचे आरोग्य वाढते, विजेची बचत म्हणजे पैशाची बचत होते, वृक्ष संगोपन संवर्धन हरीत क्षेत्र वाढते, उन्हाळ्यातील पाणी समस्या कमी होते, पूरस्थिती नियंत्रित करता येते, गाव टँकरमुक्त करता येते, शेतकऱ्याचे जीवन व आर्थिक उत्पन्न वाढविण्यात मदत होते.\"\"भविष्यातील पाण्याचे महत्व ओळखून आज पाणी आडवणे व पाणी मुरवणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. त्यानंतर पाच गावातील महिलांना पाण्याचे महत्व सांगितले. पाणी आडवा पाणी जिरवा या विषयावर बालाजी विद्यालय तावशीगडच्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धा घेण्यात आली. पथनाट्य सादर करण्यात आले. गावातून पाणी आडवा पाणी जिरवा याविषयी पदयात्रा काढण्यात आली. पाणी अडवणे व पाणी जिरवणे, पाण्याचा वापर काटकसरीने करणे याची शपथ घेण्यात आली. जलशक्ती कार्यक्रम घेऊन ५ गावात पाणी आडवा पाणी जिरवा याचे महत्त्व जलशक्ती अभियान अंतर्गत राबविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया गोरे, सोनाली पवार, कुंभार, लक्ष्मी गायकवाड, पंचशीला मनोहर, अनुसया नटवे, विजयमाला देशमुख, निर्मला यादव, शिवकन्या बिराजदार, योगिता थोरात आदींनी परिश्रम घेतले.

Tags: कॅच द रेनजलशक्ती अभियान
Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कलदेव निंबाळा येथे ज्येष्ठ नागरिक व शेतकऱ्यांचा सन्मान

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात – उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १० जणांची माघार

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी ४४ उमेदवार रिंगणात - उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १० जणांची माघार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!