Saturday, November 14, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जेवळी येथील पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच दिला भेट; सामाजिक बांधिलकी जपत राबविला उपक्रम

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0
जेवळी येथील पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच दिला भेट; सामाजिक बांधिलकी जपत राबविला उपक्रम

दिवाळी या आनंद, उत्साह आणि नव्या संकल्पांच्या सणाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत लोहारा तालुक्यातील जेवळी येथे एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. जेवळी येथील पोलीस भरती परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी मंगळवारी (दि.१०) उपयुक्त पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.
तालुक्यातील जेवळी येथील अनेक युवक पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून मेहनत घेत आहेत. या होतकरू युवकांना अभ्यासासाठी प्रोत्साहन आणि आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे, या उदात्त हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समिती, समतानगर, जेवळी (उत्तर) यांच्यामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर, जेवळी यांना भेट स्वरूपात पोलीस भरती परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त पुस्तकांचा संच भेट देण्यात आला.

ही भेट केवळ पुस्तकांची नसून युवकांच्या स्वप्नांना बळ देणारी आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याला दिशा देणारी ज्ञानरूपी भेट आहे. ग्रामीण भागातील युवकांना योग्य अभ्यास साहित्य, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते निश्चितच यशाची शिखरे गाठू शकतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणविषयक विचारांना अभिप्रेत असलेला ज्ञानाचा प्रसार आणि सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून अधोरेखित होते. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन जेवळीतील अनेक युवकांनी पोलीस दलात भरती होऊन आपल्या गावाचे, आई-वडिलांचे आणि परिसराचे नाव उज्ज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.


यावेळी भरतीपूर्व पोलीस प्रशिक्षण प्रशिक्षक अविनाश दांडेकर, बाळासाहेब कांबळे, मारुती गवळी, प्रवीण माटे, बालाजी कांबळे, बलभीम गायकवाड, विशाल साळुंके, सनी क्षीरसागर, रणवीर भांडारकवठे, प्रतीक सुरवसे, प्रेमनाथ मोरे, मनोज गायकवाड, साई शिंदे आदींसह नागरिक उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: जेवळीपोलीस भरतीलोहारा तालुका
Previous Post

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

Related Posts

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय
लोहारा तालुका

विद्यार्थ्यांनी केली वनस्पती व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन
लोहारा तालुका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोहारा नगरपंचायतच्या आरओ प्लांटचे उद्घाटन

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड
लोहारा तालुका

सीमेवर दीपावली साजरा करणाऱ्या सैनिक जवानांसाठी विद्यार्थ्यांनी बनवले आकर्षक दीपावली शुभेच्छा कार्ड

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार
आरोग्य व शिक्षण

गरिबीवर मात करीत वैद्यकीय क्षेत्रात वसीयाची भरारी – हॉटेल व्यावसायिकाची कन्या कु. वसीया मुल्लाची बीएएमएस अभ्यासक्रमासाठी निवड; ज्ञानज्योती संस्थेच्या शिष्यवृत्तीचा मोलाचा आधार

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!