उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम संपन्न झाला. यात लोहारा शहरातील भरत सुतार यांची लोहारा तालुकाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे.
उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन या संघटनेच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर झाला होता. या निवडणुकीत २७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी पर्यंत १४ जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १३ जागांसाठी १३ उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे सांगण्यात आले. या निवडणुकीत लोहारा तालुका प्रतिनिधी म्हणून भरत शंकर सुतार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे भरत सुतार यांची बिनविरोध निवड झाली आहे.






