Saturday, October 10, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी झाले ८०.७८ टक्के मतदान – ५४६० पैकी ४४११ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२१) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. एकूण ५४६० पैकी ४४११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८०.७८ टक्के मतदान झाले. किरकोळ शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत पार पडले.
लोहारा नगरपंचायतीच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणास स्थगिती दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी प्रवर्गाच्या प्रभागाची निवडणूक स्थगित केली होती. त्यामुळे लोहारा नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या चार प्रभागाची वगळता उर्वरित १३ प्रभागातील निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली होती. तर काँग्रेस(आय) ने स्वबळावर निवडणूक लढवली. या १३ जागेसाठी राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवार असे एकूण ५४ जण निवडणूक रिंगणात होते. अखेर उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी यापैकी १० जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने १३ जागांसाठी ४४ जण नशीब आजमावत होते. त्यापैकी प्रभाग क्रमांक २ व प्रभाग क्रमांक ११ मधील अपक्ष उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस – शिवसेना आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे १३ जागेसाठी एकूण ४२ जण नशीब आजमावत होते. अखेर सर्व उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने एक आचारसंहीता पथक, तीन क्षेत्रिय अधिकारी, १३ मतदान केंद्राध्यक्ष, ३९ मतदान केंद्र अधिकारी, १३ सेवक नेमण्यात आले होते. १३ मतदान केंद्र निर्माण केले होते. मतदान प्रकिया व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी निवडणूक निरीक्षक म्हणून अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेत मतदान पार पडले. एकूण ५४६० पैकी ४४११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी ८०.७८ टक्के मतदान झाले. काही ठिकाणी झालेला किरकोळ शाब्दिक वाद वगळता मतदान शांततेत पार पडले. मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान पार पडल्यानंतर सर्व केंद्राध्यक्ष यांनी मतदान केंद्रावर झालेल्या मतदानाचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी राजकुमार माने यांच्याकडे सोपविला.

——————–
मतमोजणी १९ जानेवारीला

लोहारा नगरपंचायतीच्या १३ जागांसाठी मतदान पार पडले. परंतु उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया होणार आहे. या ४ जागांसाठी १८ जानेवारीला मतदान होणार आहे. त्यानंतर १९ जानेवारीला सर्वच १७ जागांसाठीची मतमोजणी होणार आहे.

Tags: लोहारा नगरपंचायत निवडणूक
Previous Post

कोरोनामुळे दगावलेल्या कर्त्या व्यक्तीच्या कुटुंबाना सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचा मानवतावादी आधार

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी सुधारित फेर सोडत कार्यक्रम संपन्न – प्रभाग क्र. ८ व १७ सर्वसाधारण स्त्री तर प्रभाग क्र. १० व १६ सर्वसाधारण

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा नगरपंचायतीच्या चार जागांसाठी सुधारित फेर सोडत कार्यक्रम संपन्न - प्रभाग क्र. ८ व १७ सर्वसाधारण स्त्री तर प्रभाग क्र. १० व १६ सर्वसाधारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!