वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा आयोजित उपजीविका वर्ष २०२२-२३ महाजीविका अभियान परिवर्तन महिला प्रभागसंघ कानेगाव अंतर्गत सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता समुह लोहारा (खु) संचलित कॉप-शॉप सुरू करण्यात आले आहे. या कॉप-शॉपचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे व लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२२) करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे बोलताना म्हणाल्या की, महिलांनी वेळोवेळी अभियानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला हवा व याही पुढे जाऊन महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलींग व मार्केटिंग वर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.