वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती लोहारा आयोजित उपजीविका वर्ष २०२२-२३ महाजीविका अभियान परिवर्तन महिला प्रभागसंघ कानेगाव अंतर्गत सद्गुरू महिला स्वयंसहाय्यता समुह लोहारा (खु) संचलित कॉप-शॉप सुरू करण्यात आले आहे. या कॉप-शॉपचे उद्घाटन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे व लोहारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.२२) करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी प्रकल्प संचालक प्रांजल शिंदे बोलताना म्हणाल्या की, महिलांनी वेळोवेळी अभियानाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचा सदुपयोग करून घ्यायला हवा व याही पुढे जाऊन महिलांनी आपली उत्पादने बाजारपेठेत विक्री होण्याच्या दृष्टीने पॅकेजिंग, लेबलींग व मार्केटिंग वर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले.या कार्यक्रमासाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, संखिकी विस्तार अधिकारी व्ही. व्ही. शहापुरकर, विस्तार अधिकारी एस. पी. भालेराव,जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) समाधान जोगदंड, सांखिकी विस्तार अधिकारी विनोद पवार, तालुका अभियान व्यवस्थापक अलंकार बनसोडे, तालुका व्यवस्थापक प्रणिता कटकदौंड, कौशल्य विकास तालुका समन्वयक माधुरी माळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, प्रदीप चाव्हण, प्रशासन सहाय्यक रामेश्वर धुरगुडे, प्रभाग कृषी व्यवस्थापक किशोर हुडेकर, प्रभाग पशु व्यवस्थापक नंदन थोरात, कानेगाव प्रभागातील सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, कविता मुर्टे आदींस महिला उपस्थित होत्या.