वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त लोहारा शहरात जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रम घेऊन मंगळवारी (दि.३१) जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच नगरपंचायत कार्यालयात प्रतिमेचे पूजन उपनगराध्यक्ष आयुब हबीब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. शहरातील डॉ.श्रीगीरे हॉस्पिटल येथे जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रक्त संकलन उस्मानाबाद येथील सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले. सायंकाळी जयंती उत्सव समितीच्या वतीने मिरवणुक काढण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या कार्यक्रमास माजी सरपंच नागणा वकील, पं.स. माजी सदस्य चंद्रकांत पाटील, माजी सरपंच शंकर जट्टे, शिवसेना ज्येष्ठ नेते अभिमान खराडे, युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, मेडिकल असोसिएशन तालुकाध्यक्ष प्रमोद बंगले, नगरसेवक अमिन सुंबेकर, रोहयो माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, पं.स.माजी सदस्य दिपक रोडगे, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, रौफ बागवान, हाजी बाबा शेख, बाळासाहेब पाटील, अॅड. दादासाहेब पाटील, शब्बीर गवंडी, महेबुब गवंडी, रंजना हासुरे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे, डॉ. हेमंत श्रीगिरे, डॉ. गुणवंत वाघमोडे, तलाठी जगदिश लांडगे, पं.स. माजी सदस्य सुधीर घोडके, रघुवीर घोडके, भाजपा ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष दगडु तिगाडे, माजी उपनगराध्यक्ष प्रताप घोडके, निळकंठ कांबळे, बालाजी बिराजदार, गणेश खबोले, महेश गोरे, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, भाजपा जिल्हा चिटणीस विक्रांत संगशेटटी, कमलाकर सिरसाट, नगरसेवक विजयकुमार ढगे, प्रशांत काळे, दिपक मुळे, उमेश देवकर, भाजपा किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, भगवान मक्तेदार, मल्लिनाथ घोंगडे, विकास घोडके, उत्तम पाटील, जयंती उत्सव समिती अध्यक्ष जयसिंग बंडगर, उपाध्यक्ष प्रेम लांडगे, सचिव राहुल विरोधे, कोषाध्यक्ष प्रशांत थोरात, श्रीकांत तिगाडे, बलभीम विरोधे, अंकुश बंडगर, काका घोडके, विकास पांढरे, गोपाळ घोडके, महेश वाघे, अक्षय वाघे, अंगद बंडगर, प्रदीप घोडके, अजित घोडके, रमेश बंडगर, गोरख घोडके, वैभव घोडके, राम सुरवसे, अनिल विरोदे, अमोल बंडगर, हर्षद बंडगर, धवल खताळ, अमित महानुर, नितीन वाघे, रोहित विरोधे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.