वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
काही दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात शुक्रवारी ( दि.१९) सकाळी पोलिसांचे पथसंचलन झाले. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले.
काही दिवसांपूर्वी अमरावती येथे झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लोहारा पोलिस ठाण्याच्या वतीने हे पथसंचलन घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी लोहारा पोलीस ठाण्यातून पथसंचलनास सुरुवात झाली. आंबेडकर चौक, जगदंबा मंदिर, तहसील कार्यालय पर्यंत जाऊन तेथून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पोलीस ठाण्यापर्यंत हे पथसंचलन करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते, प्रभारी पोलिस निरीक्षक सुनीलकुमार काकडे, पोलिस उपनिरीक्षक ए. एन. वाठोरे, पोलिस उपनिरीक्षक एस. जी. भुजबळ यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.कोणत्याही जाती धर्माच्या भावना दुखावतील असे फोटो, मजकूर सोशल मीडियावर पोस्ट करू नये, कोणत्याही अफवा, चुकीची माहिती, धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, खोट्या बातम्या पसरवू नका. अशा प्रकारच्या कृत्यावर पोलिसांची करडी नजर असून अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती स्पीकरद्वारे शहरातील नागरिकांना यावेळी देण्यात आली.