Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील सालेगाव येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे सालेगाव आरोग्य वर्धिनी केंद्र (उपकेंद्र) येथील १८ वर्षांवरील सर्व पात्र लाभार्थींना कोविड लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. त्यामुळे सालेगाव उपकेंद्र १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील पहिले आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले आहे.
लोहारा तालुक्यातील सालेगाव आरोग्य वर्धिनी केंद्र अंतर्गत
दक्षिण सालेगाव, उत्तर सालेगाव या दोन गावांचा समावेश होतो. येथील एकूण १८ वर्षांवरील नागरिकांची संख्या २३५७ असून सर्व पात्र लाभार्थींना लसीकरण करण्यात आले. सालेगाव आरोग्य वर्धिनी केंद्रातील आरोग्य विभागातील टीम सदस्य समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप बनसोडे, आरोग्य सेविका कोमल भालेराव, आरोग्य सहाय्यक विजयकुमार हळीखेडकर, आरोग्य सेवक गणेश लुल्ले, अर्धवेळ परिचर मंगल कांबळे, आशा स्वयंसेविका लतिका साळुंके, स्मिता भालेराव यांनी मिशन कवच कुंडल तरच हर घर दस्तक अंतर्गत नियमित सत्र तसेच मोबाईल टीमद्वारे नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले. सालेगाव येथील सरपंच नारायण गुरव, ग्रामसेवक एन. बी. भोरे, पोलिस पाटील बालाजी मातोळे, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी बबन बाबर तसेच ग्रामपंचायत मधील डाटा एन्ट्री ऑपरेटर अमोल कांबळे यांनी घरोघरी आरोग्य टीम सोबत फिरून लोकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र, माकणी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. रोहिणी महादवाड, डॉ. प्रगती शिंदे यांनी मोबाईल टीम उपलब्ध करून देत क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या टीमला प्रोत्साहन दिले. तसेच स्पर्श ग्रामीण रुग्णालय येथील प्रकल्प अधिकारी रमाकांत जोशी यांनी त्यांची मोबाईल टीम पाठवून जनजागृती तसेच लसीकरण करत मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच हॅलो मेडिकल फाऊंडेशन, एनएसई फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थांनीही लसीकरणाबाबत जनजागृती केली.

———-
लस घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांच्या लसीकरणासाठी सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

डॉ. अशोक कटारे,
तालुका आरोग्य अधिकारी लोहारा

Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९ लसीकरण
Previous Post

तीनही नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा – शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याबद्दल लोहाऱ्यात काँग्रेसकडून जल्लोष

Next Post

लोहारा शहरात पोलिसांचे पथसंचलन – नागरिकांना केले आवाहन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा शहरात पोलिसांचे पथसंचलन - नागरिकांना केले आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!