Vartadoot
Monday, April 13, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरासह तालुक्यात वेळ अमावस्या सण साजरा

admin by admin
02/01/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह तालुक्यात व परिसरात काळ्या आईच्या सन्मानाचा उत्सव असलेला वेळ अमावश्येचा सण रविवारी ( दि. २) पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबियांसह मोजक्याच निमंत्रित मित्र, पाहुण्यांसोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला.
हा सण शेतकरी वर्गासाठी अत्यंत महत्वाचा आहे. अगदी सकाळ पासूनच शेताकडे जाण्यासाठी शेतकऱ्यांची कुटुंबासह घाई होती. शेतकऱ्यांनी शेतात एक खोप (कोप) तयार करून त्याच ठिकाणी धान्याची आणि मांडलेल्या पांडवांची पूजा करून एका अर्थाने वनराईची भक्तीभावाने पूजा केली. या पुजेसाठी नैवैद्य ही खास असतो. त्यामध्ये शेंगदाण्याचे लाडू, बोरे, जांभ, हरभऱ्याची ओली भाजी, ताक, लसूण व भाकरीच्या पीठापासून तयार केलेले अंबील, विविध भाज्या एकत्र करून तयार केलेली भज्जी आणि ज्वारी, गहू, बाजरीचे (सजगुर्याचे) उंडे याचा समावेश असतो. गोड पदार्थ म्हणून तिळगुळाची पोळी आणि गव्हाची खीर असते. त्याच प्रमाणे काही ठिकाणी पांढरी ज्वारी सडुन तयार केलेला आंबटभात ही असतो. आंबील वाटीत घेऊन शेतकरी भाऊ-भाऊ , पिता-पुत्र, आजा-नातू आदी पुऱूष पुजेभोवती प्रदिक्षणा घातल्या. यावेळी “इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ दे” असा घोष करण्यात आला. या पुजेचे वैशिष्ठ म्हणजे यात कुठलेच पौरोहीत्य नसतात. उघड्यावरच ज्योत पेटवली जाते. स्वत: बळीराजा ही पूजा करतो.               पूजा झाल्यानंतर आग्रहाने निमंत्रित केलेल्या मित्र, पाहून्यांच्या जेवणाच्या पंगती बसतात. त्यामुळे रविवारी ( दि. २) तालुक्यातील शेतशिवार माणसांनी फुलून निघाला होता. वेळ अमावस्या निमित्त शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासह मित्र परिवार यांच्यासोबत वनभोजनाचा आस्वाद घेतला. वेळ अमावस्या मुळे लोहारा शहरासह तालुक्यात अघोषित संचारबंदी झाल्याची परिस्थिती होती.
————————————————————
रानमेव्याचा आस्वाद !

एरवी कधीतरी शेताकडे येणारी सर्व मंडळी या सणानिमित्त शेताकडे जातात. सध्या शेतात हरभरा, गहु, ज्वारी पिक असल्यामुळे त्यांनी वाटान्याच्या शेंगा, ऊस, गव्हाच्या ओम्ब्या यासह बोरं या रान मेव्याचा आस्वाद घेतला. तसेच काही हौसी लोकांनी शेतातील मोहाळाची शिकार करून त्याच्या मधाचा आस्वाद घेतला.
————————————————————

या दिवशी सायंकाळी कडब्याच्या पेटत्या पेंड्या हातात घेऊन शेतकऱ्यानी आपापल्या शेताला प्रदक्षिणा घातली. यामुळे पिकावर रोगांचा प्रार्दुर्भाव होत नाही अशी धारणा आहे.
————————————————————

अमावस्या सणाची संस्कृती

मुळ कर्नाटकातील असणारा वेळ अमावास्या हा सण महाराष्ट्रातील उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यासोबत शेजारील तालुक्यांमध्ये मार्गशीर्ष अमावस्या म्हणजेच वेळ अमावस्या मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. ही आमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते. मूळ कानडी शब्द “येळ्ळ अमावस्या” म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या शब्द रुढ झाला. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. त्यामुळे या दिवशी सर्व जण आवर्जून येतात. व या सणाचा आनंद घेतात.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: वेळअमावस्या
Previous Post

आझादी का अमृत महोत्सव निमित्त उमेदच्या बारा गटांना २३ लाखाचे कर्ज वितरण – एसबीआय शाखा निलंगाच्या वतीने बँक मेळाव्याचे आयोजन

Next Post

उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिका आणि बालिका सन्मान कार्यक्रम संपन्न

Related Posts

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
लोहारा तालुका

लोहारा शहरात क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

12/04/2026
वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम
लोहारा तालुका

वडगाव (गां) येथे क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम

12/04/2026
भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती
लोहारा तालुका

भारत शिक्षण संस्थेच्या माकणी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. डी. व्ही. माने यांची नियुक्ती

10/04/2026
खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट
लोहारा तालुका

खासदार निंबाळकर यांची लोहारा येथील ब्रह्मकुमारीज आध्यात्मिक केंद्राला भेट

06/04/2026
जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
लोहारा तालुका

जिल्हा परिषद शिक्षक अनिल अर्जुने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

04/04/2026
पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन
राजकीय

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान – लोहाऱ्यात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

02/04/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील कलदेव निंबाळा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिक्षिका आणि बालिका सन्मान कार्यक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's