वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुका सचिव बालाजी यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (दि.22) अनावश्यक खर्च टाळून लोहारा तालुका संभाजी ब्रिगेडकडून लोहारा तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यात सॅनिटायझर व मास्क वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या संकटकाळात आपल्या जीवाची पर्वा न करता लोहारा पोलिसांनी अविरत अखंड सेवा बजावल्याने तसेच महसूल कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी देखील कोरोनाच्या संकट समयी योग्य नियोजन करीत कर्तव्य बजावल्याने त्यांना सॅनिटायझर व मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, बालाजी यादव, किरण सोनकांबळे, अविनाश मुळे, महादेव मगर, प्रणित सूर्यवंशी, पवन चौधरी आदीसह तहसिल कार्यालय व पोलीस ठाणे येथील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!
No Result
View All Result