वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या कडे केली होती. याची तात्काळ दखल घेऊन अर्थसंकल्पात २१ कोटी ८५ लाख रुपये मंजूर केले आहेत.
उमरगा व लोहारा तालुक्यातील विविध रस्ते व विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली होती. त्यानंतर या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पात भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामांसाठी एकूण २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात रामा २११ – धानुरी हराळी तोरंबा कलदेवनिंबाळा समुद्राळ होळी रस्त्याची सुधारणा करणे दोन कोटी ८५ लक्ष, राममा ६५ ते उमरगा तालुक्यातील दाळिंब काळनिंबाळा कडदोरा व्हनताळ एकुरगा ते रामा २३९ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी तीन कोटी ८० लाख, राममा ६५ ते उमरगा तालुक्यातील दाळिंब काळनिंबाळा कडदोरा व्हनताळ एकुरगा ते रामा २३९ या रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पाच कोटी ७० लाख, राममा ९ ते तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग लोहगाव कुंसावळी बोळेगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी पाच कोटी ४१.५० लाख,लोहारा तालुका रामा २११ ते जेवळी धानुरी माकणी ते जिल्हा सरहद्द रस्ता काँक्रीट रस्ता व गटारीचे बांधकाम करणे यासाठी दोन कोटी ८५ लाख, रामा २११ ते जेवळी धानुरी माकणी ते जिल्हा सरहद्द रस्त्याच्या कामासाठी एक कोटी २३.५० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.उमरगा व लोहारा तालुक्यातील या कामांसाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.