Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे…… गोविंद पाटील – मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
तरुणांच्या बाह्य व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास हा अशा राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरामध्ये सहभागी झालेल्या शिबीरांमधून होतो. अशी शिबीरे ही तरुणांच्या व्यक्तीमत्वाची माध्यमे असल्याचे प्रतिपादन उमरगा पंचायत समितीचे माजी उपसभापती गोविंद पाटील यांनी केले.
गणेशनगर, ता. उमरगा येथे श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने \’ ग्रामस्वच्छता, जलसंवर्धन व आरोग्य संवर्धनासाठी युवा वार्षिक शिबीर \’ च्या समारोप कार्यक्रमात बुधवार (ता. ३०) प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकटराव जाधव गुरूजी होते. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगनाथ जगताप, सरपंच उषा चव्हाण, उपसरपंच सतिश पवार, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, मुख्याध्यापक सुभाष राठोड, उपसरपंच, तंटामुकत समितीचे अध्यक्ष माणिक राठोड, पोलीस पाटील कलावती चव्हाण, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. संध्या डांगे, एनएसएसचे विद्यार्थी प्रतिनिधी योगेश पांचाळ, अमितकुमार बनसोडे, लता कांबळे, अंजली स्वामी आदिंची प्रमुख उपस्थिती होती.\"\"यावेळी पुढे बोलताना गोविंद पाटील म्हणाले की, महाविद्यालयातील शिक्षणाबरोबरच बाह्य शिक्षण माणसाला व्यावहारीक जीवन शिकविते. यामुळे आपले व्यक्तीमत्व सतत घडत असते. आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळून जगण्याचा एक आदर्श मार्ग सापडतो. अशा शिबीरांमधून खुप शिकण्यासारखे असून त्याचा पुरेपुरे उपयोग तरुणांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी शेवटी केले. यावेळी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी चांगला संकल्प करुन स्वतःचा विकास करुन घ्यावा असे आवाहन केले. यावेळी रंगनाथ जगताप, अमोल कटके व भाग्यश्री पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. उत्कृष्ट सहभागाबद्ल सोनाली चव्हाण, दिक्षीवंत जाधव, शितल कटके, सोनू चव्हाण, सोनाली जाधव, श्वेताराणी कसनकर, नामदेव शिंदे, यशोदा बोडरे, आकाश पांचाळ, पुजा शिंदे, प्राजक्ता थोरात, सतिश महिंद्रकर आदींचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. महेश मोटे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. लखन पवार, प्रा. सचिन राजमाने, प्रा. अशोक बावगे, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. सुशील मठपती, प्रा. भूषण पाताळे, श्रावण कोकणे, प्रभाकर महिंद्रकर, दत्ता कुंभार आदींनी पुढाकार घेतला. प्रास्ताविक प्रा. डॉ. रवि आळंगे यांनी केले. प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले यांनी सूत्रसंचालन तर प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
Previous Post

उमरगा तालुक्यातील चिंचोली भुयार जिल्हा परिषद शाळेत खरी कमाई उपक्रम

Next Post

उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर – जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

उमरगा व लोहारा तालुक्यातील रस्ते व विकास कामांसाठी तब्बल २१ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर - जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या पाठपुराव्याला यश - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी केली होती उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!