वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार (दि. ३०) ७ अखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २८) एकूण ७ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी ११ तर बुधवारी १८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले. आत्तापर्यंत एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यापैकी ३ सरपंच पदासाठी तर ३३ सदस्य पदासाठी आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
——
ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी
१३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. परंतु ऑनलाईन फॉर्म दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने फॉर्म भरण्यास खूप वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकजण रात्रभर बसून ऑनलाईन फॉर्म दाखल करत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गावपुढाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.