वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील मोघा रस्त्याजवळ असलेल्या रूपेश बिअरबारशेजारील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शनिवारी (दि.२३) पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कमेसह तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरोधात लोहारा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील पंधरा दिवसांपासून अवैध धंद्याविरोधात पोलिस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी जुगार अड्ड्यावर धाडी टाकून अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणली आहेत. दरम्यान शहरातील मोघा रस्त्याजवळ असलेल्या रूपेश बिअरबारशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून रोख रक्कमेसह तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणाविरोधात लोहारा पोलिसांत शनिवारी (दि.२३) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा तालुक्यात मागील काही महिन्यांपासून अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू होते. याविरुद्ध कोणतीच कारवाई होत नसल्याने अवैध धंदेवाल्यांचे मनोबल वाढले होते. परंतु आता पोलिस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांत जिल्हा पोलिस दलाने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील होळी येथे जुगार अड्ड्यावर मोठी कारवाई करीत दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करीत १९ जणांवर कारवाई करण्यात आली होती. तर लोहारा शहरातील मोघा रस्त्याजवळ असलेल्या रूपेश बिअरबारशेजारी असलेल्या पत्र्याच्या शेड मध्ये चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर शनिवारी सायंकाळी पोलिसांनी धाड टाकली. यावेळी के. डी. पाटील, बालाजी बंडगर, दत्ता निर्मळे, बाळू पाटील, मल्लिनाथ जट्टे हे पाच जण जुगार खेळताना मिळून आले. यांच्या ताब्यातील ४३ हजार रोख रक्कमेसह तीन लाख १३ हजार ६६० रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या पाच जणांविरोधात लोहारा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उमरगा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईने अवैध धंदेवाल्याचे धाबे दणाणले आहेत.