वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील जेवळी (दक्षिण) येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचे बक्षीस वितरण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आले.
गणेश मंडळाच्या वतीने आयोजित संगीत खुर्ची स्पर्धेत लक्ष्मी होनाजे प्रथम, वैष्णवी होनाजे द्वितीय तर दिव्या बिराजदार तृतीय आली. तसेच लिंबू चमचा स्पर्धेत संस्कृती कारभारी प्रथम, वैष्णवी होनाजे द्वितीय तर तनिष्का भैरप्पा यांनी तृतीय पारितोषिक मिळविले.
सर्व विजेत्या स्पर्धेकांचे शाळेच्या वतीने कमलाकर येणेगुरे यांनी अभिनंदन केले. बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी किशोर होनाजे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. साळुंके यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते.