Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथील न्यू व्हिजन स्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा

by admin
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.१५) वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. यशवंत चंदनशिवे म्हणाले की, डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला होता. बालपणी दररोज सकाळी ते लोकांच्या घरी पेपर वाटण्याचे काम करून नंतर शाळेत जायचे. त्यांनाही वाचनाची खूप आवड होती. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले आणि शिक्षणाच्या व स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांनी अनेक संशोधन केले व रॉकेट , अणुबॉम्ब तयार करून जगामध्ये आपल्या देशाचा दबदबा निर्माण करणारे ते थोर शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच त्यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला. अशा या महान व्यक्तीचा जन्म दिवस हा आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो असे सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी स्कूलमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे १४५ विद्यार्थी व १५ शिक्षक कर्मचारी यांनी १ तास विविध पुस्तकांचे वाचन केले. यानंतर मुख्याध्यापक शहाजी जाधव यांनी जागतिक \”हात धुवा दिन\” याची माहिती सांगून आरोग्य विभागाच्या नियमानुसार हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दररोज सर्व विद्यार्थ्यांनी शौचास जावून आल्यानंतर व जेवना अगोदर याप्रकारे स्वच्छ हात धुवावे व स्वच्छतेचे महत्व सांगितले. याप्रसंगी सविता जाधव, संचीता बाचपल्ले, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, सारिका पवार, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, अस्मिता देवकते, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, प्रेमनाथ राठोड, विजय कांबळे उपस्थित होते.

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलवाचन प्रेरणा दिन
Previous Post

राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने मारली बाजी

Next Post

जेवळी (दक्षिण ) येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळ आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

जेवळी (दक्षिण ) येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळ आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!