वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील हायस्कुल लोहारा येथे शनिवारी (दि. ७) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. यात धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने प्रथम क्रमांक पटकाविला.
लोहारा येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यात विद्यामाता इंग्लिश स्कुल मधील रतिकांत संतोष सारणे व संस्कार दयानंद म्हमाणे या मुलांनी तयार केलेले शेतीपूरक अवजार या साहित्याने सर्व शाळांचे लक्ष वेधून घेतले. एकाच अवजारावर पाणी देणे गवत कापणी व जमिनीची मशागत करता येते असे शेतीपूरक अवजार या विद्यार्थ्यांनी तयार केले. परीक्षकांनी सुद्धा या प्रयोगाचे कौतुक केले. या प्रयोगाची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे. स्कुलच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे यांचे मार्गदर्शन, विषय शिक्षिका सुनीता सलगरकर व तसेच सुवर्णा शिंदे, ओम सूर्यवंशी, सुनील कांबळे यांच्या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा प्रयोग यशस्वी झाला.