वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
त्रिपुरा राज्यात काही समाज कंटकांनी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घराची व मालमतेचे नुकसान करीत पवित्र असलेल्या मस्जिदचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे या मागणीसाठी लोहारा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय यांना शुक्रवारी (दि.१२) निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यात मागील आठवड्यात विश्व हिंदु परिषद यांच्या लोकांनी बांग्लादेशातील दुर्गापुजा हिंसाचाराचे निमित्त करुन एक नियोजित रॅली काढुन शांतेतेचे राज्य असलेल्या प्रदेशामध्ये खास करुन मुस्लीम समुदायाला लक्ष करुन मोठ्या प्रमाणावर दंगल घडवुन मस्जीद व मालमत्तेचे जाळपोळ करुन नुकसान पोहचविले आहे. याचा आम्ही तिवृ निषेध करत आहोत. त्रिपुरा राज्यात पाच जिल्हा मशीदी व मुस्लीम समाजाची घरे व मालमत्तेचे नुकसान विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्रालय व त्रिपुरा राज्यातील भाजपा सरकार यांच्या विचार सरणीचे लोक दंगल करीत असल्याने ही दोन्ही सरकारे गप्प आहेत. हे देशहिताचे नाही. कायदा सर्वांना समान आहे. विश्व हिंदु परिषदेच्या या कार्यकर्त्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे. रॅलीमध्ये प्रषितांवर टिका टिप्पणी करणे पर्यंत मजाल गेली आहे. हे अत्यंत निंदनीय व चीड निर्माण करणारे आहे. असे कृत्य भविष्यात सहन केले जाणार नाही याची आपण गांभीर्यांने दखल घ्यावी व त्रिपुरा राज्याातील दंगलीमध्ये मुस्लीाम समाजाचे ज्या भागामध्ये नुकसान झालेले आहे ते ताबडतोब भरुन द्यावे. तेथील अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायाला संरक्षण द्यावे व विश्व हिंदु परिषद दंगलखोराना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरुन भारतामध्ये शांतता राहिल अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शब्बीर गवंडी, हाफीज शमशोद्दीन पठाण, आयुब शेख, पेशइमाम गणी अत्तार, इक्बाल कुरेशी, बाबा शेख, सलीम शेख, आब्बास शेख, महेबूब गवंडी, परवेज तांबोळी, आमीन मुलानी, आशपाक शेख, निहाल मुजावर, सलीम सय्यद, आरिफ खानापुरे, समीउल्ला पठाण, बशीर खडीवाले, शोएब मनियार, शारुख गवंडी, मोईज शेख, फयाज नदाफ, समीर हेड्डे, सरफराज सिध्दकी, कलिम कुरेशी, हाजु खुटेपड, मुजाहिद मुल्ला आदी उपस्थित होते.