Sunday, October 11, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर अन्याय करणाऱ्यावर कठोर शासन करा – मुस्लिम समाजाची निवेदनाद्वारे मागणी

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
त्रिपुरा राज्यात काही समाज कंटकांनी मुस्लिम समाजातील नागरिकांच्या घराची व मालमतेचे नुकसान करीत पवित्र असलेल्या मस्जिदचे नुकसान करणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर शासन करावे या मागणीसाठी लोहारा येथील मुस्लिम समाजाच्या वतीने लोहारा तहसीलदार मार्फत माननीय राष्ट्रपती महोदय यांना शुक्रवारी (दि.१२) निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यात मागील आठवड्यात विश्व हिंदु परिषद यांच्या लोकांनी बांग्लादेशातील दुर्गापुजा हिंसाचाराचे निमित्त करुन एक नियोजित रॅली काढुन शांतेतेचे राज्य असलेल्या प्रदेशामध्ये खास करुन मुस्लीम समुदायाला लक्ष करुन मोठ्या प्रमाणावर दंगल घडवुन मस्जीद व मालमत्तेचे जाळपोळ करुन नुकसान पोहचविले आहे. याचा आम्ही तिवृ निषेध करत आहोत. त्रिपुरा राज्यात पाच जिल्हा मशीदी व मुस्लीम समाजाची घरे व मालमत्तेचे नुकसान विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले. केंद्रीय गृहमंत्रालय व त्रिपुरा राज्‍यातील भाजपा सरकार यांच्या विचार सरणीचे लोक दंगल करीत असल्याने ही दोन्ही सरकारे गप्प आहेत. हे देशहिताचे नाही. कायदा सर्वांना समान आहे. विश्व हिंदु परिषदेच्या या कार्यकर्त्यांवर कठोरात कठोर कार्यवाही करणे गरजेचे आहे. रॅलीमध्ये प्रषितांवर टिका टिप्पणी करणे पर्यंत मजाल गेली आहे. हे अत्यंत निंदनीय व चीड निर्माण करणारे आहे. असे कृत्य भविष्यात सहन केले जाणार नाही याची आपण गांभीर्यांने दखल घ्यावी व त्रिपुरा राज्याातील दंगलीमध्ये मुस्लीाम समाजाचे ज्या भागामध्ये‍ नुकसान झालेले आहे ते ताबडतोब भरुन द्यावे. तेथील अल्पसंख्यांक मुस्लीम समुदायाला संरक्षण द्यावे व विश्व हिंदु परिषद दंगलखोराना कठोरात कठोर शिक्षा द्यावी. जेणेकरुन भारतामध्ये शांतता राहिल अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शब्बीर गवंडी, हाफीज शमशोद्दीन पठाण, आयुब शेख, पेशइमाम गणी अत्तार, इक्बाल कुरेशी, बाबा शेख, सलीम शेख, आब्बास शेख, महेबूब गवंडी, परवेज तांबोळी, आमीन मुलानी, आशपाक शेख, निहाल मुजावर, सलीम सय्यद, आरिफ खानापुरे, समीउल्ला पठाण, बशीर खडीवाले, शोएब मनियार, शारुख गवंडी, मोईज शेख, फयाज नदाफ, समीर हेड्डे, सरफराज सिध्दकी, कलिम कुरेशी, हाजु खुटेपड, मुजाहिद मुल्ला आदी उपस्थित होते.

Previous Post

राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत – लोहारा तालुका भाजपाची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम – अँड. दादासाहेब पाटील यांनी केले मार्गदर्शन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द येथे कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम - अँड. दादासाहेब पाटील यांनी केले मार्गदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!