समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व बालगृहातील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन श्री तुळजाभवानी स्टेडियम व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह धाराशिव येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील सास्तुर येथील निवासी विद्यालयाने १२ सुवर्ण, १० रजत, ०९ कांस्यपदकांसह तब्बल ३१ पदकांची कमाई केली आहे.
या स्पर्धेत जिल्हाभरातून ८०० पेक्षा अधिक दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते. तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग विद्यालयाच्या स्पर्धकांनी विविध क्रीडा प्रकारात चमकदार कामगिरी करताना १२ सुवर्णपदकांसह, १० रजत व ०९ कांस्य अशी एकूण ३१ पदके जिंकून या स्पर्धेतील दमदार कामगिरीच्या बळावर सास्तूर निवासी दिव्यांग शाळेच्या संघाने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अस्थिव्यंग प्रवर्गाची सलग २१ व्या वर्षी विजेतेपद पटकावून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. तर सांस्कृतिक स्पर्धेत अघोरी प्रकारातील बहारदार समूहनृत्य सादर करताना नाट्यगृहातील प्रेक्षकांची मने जिंकली. सांस्कृतिक स्पर्धेतील सलग २२ वे विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील यशस्वी संघांना अतिरिक्त जिल्हाधिकारी शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, सचिन इगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत विभाग), शाम गोडभरले, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देवदत्त गिरी, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, सहाय्यक लेखाधिकारी सुधीर जाधवर, कार्यालयीन अधीक्षक चव्हाण, धाराशिव जिल्हा दिव्यांग संस्थाचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. बी.आर कलवले, तुळजाई प्रतिष्ठान पानगावचे सचिव शहाजी चव्हाण, शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळ वाशीचे सचिव प्रताप भायगुडे, अखिल भारतीय अपंग कल्याणकारी मंडळ, खानापूरचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव, महात्मा ज्योतिबा फुले जीवन शिक्षण प्रसारक मंडळ वलगूड या संस्थेचे सचिव नितीन सरवदे, तुळजाभवानी बालगृह एकूरगावाडीचे सचिव बालाजी शिंदे, यशोदिप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रशीद कोतवाल, जूनेदभाई शेरीकर, अमजतखान पठाण, रफिक कोतवाल आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या राज्यस्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. संस्थेच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बालाजी नादरगे, प्राचार्य बी.एम.बालवाड यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
———-
स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे
अस्थिव्यंग “अ” वयोगट ८ ते १२ – प्रणव सुमंत अडसूळ, ५० मी.धावणे, भाग्येश गुंडू इस्लामपूरे, वयोगट १३ ते १६, १०० मीटर धावणे – कु. आदिती काशिनाथ गायकवाड, वयोगट १७ ते २१ कु. मुस्कान इब्राहिम बागवान, १०० मीटर व २०० मीटर धावणे.
अस्थिव्यंग “ब” १३ ते १६ वयोगट – रितेश गणेश देशमुख ५० मीटर धावणे,
अस्थिव्यंग “क” वयोगट १३ ते १६ – करण बाळू माने ५० मीटर भरभर चालणे, कु.राणी मोहन मनाळे-५० मीटर व्हीलचेअर रेस, कु.संध्याराणी बिभीषण कदम-५० मीटर धावणे भरभर चालणे, कु. ममता अशोक गोटमुखले-व्हीलचेअर वर बसून सॉफ्टबाॅल थ्रो व व्हीलचेअर रेस
रजतपदक विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे-
अस्थिव्यंग “अ” ८ ते १२ वयोगट – १०० मीटर धावणे प्रणव अडसूळ,
१७ ते २१ वयोगट – कु. भाग्यश्री गंगाधर कांबळे २०० मीटर धावणे,
अस्थिव्यंग “ब” वयोगट १३ ते १६ – महेश पवार ५० मीटर धावणे,
अस्थिव्यंग “क” वयोगट ८ ते १२ – कु. गीताश्री शरद निळे -२५ मीटर धावणे, भरभर चालणे, वयोगट १३ ते १६ – सुर्यवंशी शाम नागनाथ ५० मीटर धावणे भरभर चालणे व ५० मीटर व्हीलचेअर रेस, कु. किरण खराते- ५० मीटर धावणे व ५० मीटर व्हीलचेअर रेस, कु. संध्याराणी बिभीषण कदम- व्हीलचेअर वर बसून सॉफ्टबाॅल थ्रो, वयोगट १७ ते २१ – रोहन धनाजी कदम- ५० मीटर धावणे अथवा भरभर चालणे.
कांस्यपदक विजेते खेळाडू –
अस्थिव्यंग “अ” वयोगट १३ ते १६ – कु.राधिका धनराज बनसोडे-१०० मीटर धावणे, वयोगट १७ ते २१ – कु. भाग्यश्री गंगाधर कांबळे-१०० मीटर धावणे,
अस्थिव्यंग “ब” वयोगट १३ ते १६ – पृथ्वीराज दत्ता – ५० मीटर धावणे अथवा भरभर चालणे,
अस्थिव्यंग “क” वयोगट ८ ते १२ – कु. स्नेहा धनराज बिराजदार – २५ मीटर धावणे अथवा भरभर चालणे,
वयोगट १३ ते १६ – दत्ता गोवर्धन शिंगाडे – व्हील चेअरवर बसून सॉफ्टबाॅल थ्रो, कु. किरण बाळू खराते, व्हील चेअरवर बसून सॉफ्टबाॅल थ्रो.