Vartadoot
Tuesday, July 21, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

मुख्य संपादक by मुख्य संपादक
22/02/2026
in लोहारा तालुका
A A
0
लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
Ad 10

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त गुरुवारी (दि. १९) आयोजित राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी विविध प्रकारच्या गीतांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
लोहारा येथे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त दरवर्षी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी महाशिवरात्री यात्रा महोत्सवाचे हे २६ वे वर्ष आहे. यानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवस विविध कार्यक्रम झाल्यानंतर गुरुवारी (दि.१९) रात्री लोहारा हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेने या महोत्सवाची सांगता झाली. या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचे उद्घाटन लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष अमीन सुंबेकर, माजी सरपंच नागन्ना वकील, शंकर जट्टे, चंद्रकांत पाटील, अभिमान खराडे, नगरसेवक अविनाश माळी, दिपक रोडगे, दत्ता निर्मळे, अमोल बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी विजयकुमार ढगे, विष्णू नारायणकर, चेतन बोंडगे, गणेश कुलकर्णी, प्रमोद बंगले, ओम कोरे, डॉ. अमलेश्वर गारठे, डॉ. हंगरगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

या स्पर्धेत लावणी, देशभक्ती गीत, रिमिक्स, हिंदी मराठी आदींसह विविध कलाप्रकारावर दिलखेचक नृत्य सादर करुन स्पर्धकांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. या स्पर्धेत लातूर, बीड, सातारा, सांगली, तुळजापूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अलिबाग, उमरगा, रायगड यासह अनेक ठिकाणचे स्पर्धक सहभागी झाले होते. रात्री साडे नऊच्या सुमारास सुरू झालेली ही स्पर्धा शुक्रवारी पहाटे पाचपर्यंत चालली. अनामिका अहिरे बीड, ईश्वरी पाटील हिंगोली, अनवी मस्के लातूर, जान्हवी कसबे, अपर्णा पवार लातूर आदींनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच ओशन डान्स ग्रुप, ए. पी. डान्स ग्रुप, साईप्रेरणा, राजमाता डान्स ग्रुप या डान्स ग्रुपने सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. यावेळी अनेक स्पर्धकांच्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. तसेच सामूहिक गटाच्या सादरीकरणावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. या स्पर्धेत परीक्षक

म्हणून निलेश हतांगळे, एस. एन. आदटराव, शुभम खोत पाटील, व्यंकट चिकटे यांनी काम पाहीले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यात्रा कमिटीने परीश्रम घेतले. या दरम्यान रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले. विठ्ठल वचने पाटील यांनी प्रास्ताविक केले. भीमाशंकर डोकडे, सतीश ढगे, ईश्वर बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. तर गोपाळ सुतार यांनी आभार मानले. राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील महिला, नागरिक, युवक व परीसरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धेसाठी गोपाळ सुतार, सतीश ढगे, श्रीनिवास माळी, ओम पाटील, विरेश स्वामी, ईश्वर बिराजदार, महेश कुंभार, गणेश कुलकर्णी, गणेश हिप्परगेकर, संतोष गिरी,अमित बोराळे, ज्ञानेश्वर काडगावे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
वैयक्तिक (लहान गट) –
सर्व विभागून
प्रथम – मानवी पतंगे, अंबाजोगाई व ईश्वरी पाटील हिंगोली
द्वितीय – शौर्या गोडबोले, लातूर व प्रतीक अहेवाड, संभाजीनगर

तृतीय – अनवी मस्के व जान्हवी कसबे, लातूर

वैयक्तिक (मोठा गट)
प्रथम – श्रावणी सुतार, रायगड
द्वितीय – अपर्णा पवार, लातूर

तृतीय – गणेश देशमुख, लातूर

सामूहिक (लहान गट)
प्रथम – जि. प. प्रा. शाळा मार्डी,
द्वितीय (विभागून) – स्वामी समर्थ डान्स ग्रुप लोहारा व निवासी दिव्यांग शाळा सास्तुर

तृतीय – जि. प. प्रा. शाळा मार्डी,

सामूहिक (मोठा गट)
सर्व विभागून
प्रथम – एपी डान्स ग्रुप लातूर व ओशन डान्स ग्रुप लातूर
द्वितीय – जी बी डान्स लातूर व साई प्रेरणा रायगड

तृतीय – आदिशक्ती डान्स ग्रुप धाराशिव व राजमाता डान्स ग्रुप धाराशिव

युगल जोडी गट
प्रथम – चेतन कला मंच सांगली
द्वितीय – वैष्णवी व प्रतीक संभाजीनगर
तृतीय – अनामिका व अंकिता बीड

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहाराराज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
Previous Post

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

Next Post

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

Related Posts

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा
राजकीय

लोहारा येथे काँग्रेसचे नुतन तालुकाध्यक्ष दयानंद पाटील यांचा पदग्रहण सोहळा

16/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन
लोहारा तालुका

अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

14/07/2026
आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

आष्टाकासार येथील सेवानिवृत्त शिक्षक बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

07/07/2026
हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक नागेश बंगले यांचा सत्कार

05/07/2026
Next Post
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's