वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय लाठी काठी स्पर्धा व इंग्लिश ओलंपियाडमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा सोमवारी (दि.३०) मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे दि. २८ व २९ जानेवारीला तिसरी राष्ट्रीय लाठी अजिंक्य पदक क्रीडा स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलच्या १२ खेळाडूंनी सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. तसेच इंग्लिश ओलंपियाडमध्ये ११ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवले आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा सोमवारी (दि.३०) सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे, प्रशिक्षक महमदरफी शेख यांच्यासह स्कुलच्या शिक्षिका उपस्थित होत्या. या विद्यार्थ्यांना ओम सूर्यवंशी, सुनील कांबळे, लता पाटील, शिवमाला हुडगे, प्रशिक्षक महंमदरफी शेख यांनी मार्गदर्शन केले.
———————-
सुवर्णपदक विजेते विद्यार्थी
लाठी काठी – सिद्धांत हावळे, प्रतीक पाटील, प्रतिक कांबळे, सृष्टी सुरवसे, माधुरी कारभारी, आरती जांभळे, अश्विनी फुलसुंदर, अथर्व डिग्गे, विवेक यादव, अभिमन्यू जाधव, श्रीनिवास पोतदार, संस्कार म्हमाने
———
इंग्लिश ओलंपियाड – ओंकार गव्हाळे, प्रज्ञा गुंड, सिध्दांत हावळे, शिवम पाटील, विराट बिराजदार, विश्वतेज अंबुरे, विराट विभुते, संस्कार जांभळे, केदार भोरे, कार्तिकी बेळे, श्रेयस