Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर – ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ चित्ररथ प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर झळकला

by admin
in महाराष्ट्र
A A
0

नवी दिल्ली : ७४ व्या प्रजासत्ताक द‍िनी कर्तव्यपथावरील पथसंचलनात महाराष्ट्राच्यावतीने ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ या चित्ररथाने उपस्थितांना आकर्षित केले. राज्याच्या चित्ररथास व्द‍ितीय क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार आज जाहीर झाला आहे. उत्तराखंड राज्याला प्रथम क्रमांक तर उत्तर प्रदेश राज्याला तिसरा क्रमांक जाह‍ीर झाला. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट चित्ररथाची निवड करण्यात आली असून मंगळवारी दुपारी निवड झालेल्या राज्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यावर्षी चित्ररथाची संकल्पना ‘नारी शक्ती’ वर आधार‍ित होती. या संकल्पनेवर ‘साडेतीन शक्तिपीठे आणि नारीशक्ती’ असा मोहक चित्ररथ कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनी साकारण्यात आला. या चित्ररथाला व्दितीय क्रमांचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

\"महाराष्ट्र\"

महाराष्ट्राने ‘नारी शक्ती व साडे तीन शक्त‍िपीठा’चा महिमा चित्ररथाच्या माध्यमातून दाखविला. कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता हे तीन पूर्ण शक्तीपीठे तर वणीची सप्तश्रृंगी या अर्ध्या शक्तिपीठांचे दर्शन पथसंलनात सर्वांना घेता आले. या चित्ररथात संबळ वाजविणारे गोंधळी, पोतराज, हलगी वाजवून देवीची आराधना करणारा भक्त, असे भक्त‍िमय वातावरण कर्तव्यपथावर चित्ररथाच्यामाध्यातून दर्शविल्या गेले. यामध्ये लोककलाकार हे देवीचे भक्तीगीत गात नृत्यकरून “साडेतीन शक्तिपीठे दाखवित‍ी आम्हा दिशा….. गोंधळ मांडला ग आई गोंधळाला या ” अशी अर्चना करीत होते.

\"चित्ररथ\"

चित्ररथाची संकल्पना, सांस्कृतिक कार्य संचालनालयाची होती. शुभ ऍड या संस्थेने चित्ररथाचे काम प्रत्यक्षात उतरव‍िले होते. साडेतीन शक्तिपीठाची महिमा सांगणाऱ्या गीताला संगीत सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी दिले. तर, हे गीत प्राची गडकरी यांनी लिहीले. यासह चित्ररथावर दिसणारे कलाकार हे विजनरी परफॉर्मिंग कला समुह, ठाणे येथील होते.

Ad 2
Ad 1
Previous Post

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तोरंबा येथील जय हनुमान विद्यालयाचे यश – प्रयोगाची राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश – मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश - मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!