वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या वतीने नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत बीबीएफ पेरणी यंत्र, स्पायरल ग्रेव्हीएटी सेपरेटर, भाजीपाला बियाणे किट या बाबीचे ऑफलाईन अर्ज १ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीमध्ये मागविण्यात आले होते. सदर योजनेच्या लाभार्थी निवडीची सोडत उद्या मंगळवारी ( दि. २३) दुपारी १२ वाजता तालुका कृषि अधिकारी कार्यालयात काढण्यात येणार आहे. तरी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाग यांनी केले आहे.