महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या लोहारा तालुका शाखेच्या वतीने बुधवारी (दि.२) लोहारा पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात व्यंकट पोतदार, सतीश माळी, दिपक पोतदार, काका इंगळे यांच्यासह अनेक शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. शिक्षकाविषयी मनमानी, अपमानास्पद वागणुकीबद्दल शिक्षकांनी तिव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शिक्षकांची कामे वेळेवर होत नसल्याचा आरोप यावेळी शिक्षकांनी मनोगत व्यक्त करताना केला. तसेच प्रभारी गटशिक्षणाधिकारी रंजना मैंदर्गी यांची बदली झाली आहे. तरीही अद्याप त्यांच्याकडील लोहारा गटशिक्षणाधिकारी पदाचा पदभार काढून घेण्यात आला नाही. तरी तात्काळ त्यांच्याकडील पदभार काढून घेण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, सरचिटणीस विठ्ठल माने, विजयकुमार ओवांडकर, डि. डि. कदम, प्रशांत मिटकर यांनी मनोगत व्यक्त करीत गटशिक्षणाधिकारी यांच्या मनमानी कारभारबाबत नाराजी व्यक्त करीत अन्यायाविरुद्ध शिक्षकांनी लढण्यासाठी नेहमी सज्ज रहावे, जिल्हा संघ योग्य पाठपुरावा करेल असे प्रतिपादन केले. या आंदोलनाला ग्रामसेवक तालुका व जिल्हा संघटना, प्रहार शिक्षक संघटनेने पाठींबा दिला. यावेळी लोहारा तालुका शिक्षण विभागातील भास्कर बेशकराव, सुभाष चव्हाण, केंद्रप्रमुख मोहन शेवाळे,
गजानन मक्तेदार, नंदकुमार पोटरे, नयन शेख, विश्वजित चंदनशिवे, गोखले मामा, केंद्रीय मुख्याध्यापक मधुकर चंदनशिवे, मधुकर रोडगे, एकनाथ शिंदे, विश्वजीत चंदनशिवे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष वर्षा चौधरी, निर्मला दंतकाळे, गितांजली मोटे, ज्योती पाटील, अर्चना साखरे, मेघराज कदम, नितीन वाघमारे, सचिन मक्तेदार, जिवन गायकवाड, राम मुसांडे, सूर्यकांत पांढरे, विकास घोडके, बालाजी आलमले, राहुल ओवांडकर, रफीक शेख, रसुल शेख, कोंडीबा कारभारी, बाबासाहेब कदम, प्रविण साळुंके, राजू माळवदकर, मच्छिंद्र बोकडे, विनोद नन्नवरे, दाजीबा साबळे, मारूती ढोणे, प्रविण शिंदे, गहिनीनाथ माने यांच्यासह अनेक शिक्षक उपस्थित होते.