वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. वाचनालयाच्या वर्धापनदिनी डिसेंबर मध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे ऍड. शितल चव्हाण यांनी सांगितले आहे.
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मुळज (ता. उमरगा) येथे दि. १६ डिसेंबर २०१८ रोजी वाचनालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर वाचनालयाच्या उमरगा व लोहारा तालुक्यातील ग्रामीण भागात १३ शाखा सुरु करण्यात आल्या. तसेच ‘पान टपरी नव्हे, ज्ञान टपरी’ असे घोषवाक्य घेवून उमरगा शहरात ‘वाचन टपरी’चीही स्थापना केली गेली. वाचनालयाच्या वतीने तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती गौरव पुरस्कार देवून सन्मान करण्यात येतो. पुरस्कार वितरणाचे हे चौथे वर्ष आहे. मंगळवारी (दि.६) प्रा. शामराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी सन २०२२ च्या पुरस्कारासाठी निवड झालेल्या मान्यवरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पुरस्काराचे वितरण डिसेंबरमध्ये वाचनालयाच्या वर्धापनदिनी करण्यात येईल अशी माहिती ऍड. शितल चव्हाण यांनी दिली आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेले विविध क्षेत्रातील मान्यवर खालिलप्रमाणे आहेत.
(१) मा. श्री. विश्वनाथ महाजन सर – जीवनगौरव पुरस्कार
(२) मा. श्री. विजय जाधव (काका) – समाजरत्न
(३) मा. श्रीमती निलाबाई नारायण भालेराव – कृषीरत्न
(४) मा. सौ. शीतल हनुमंत जावळे – शिक्षकरत्न
(५) मा. श्री. वीरभद्र ऊर्फ पप्पू स्वामी – उद्योगररत्न
(६) मा. श्री. मारुती कदम – पत्रकाररत्न
(७) मा. श्री. दशरथ शिंदे – संगीतरत्न
(८) मा. श्री. बसवणाप्पा मल्लिकार्जुनप्पा इंडे – ग्रंथसेवा पुरस्कार